अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- पोहण्यास गेलेला दहा वर्षे वयाच्या मुलाचा श्रीरामपूर शहरालगत बेलापूर-पढेगाव रोडवर असणाऱ्या खटकाळी गावठाण येथील खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी हा मृतदेह सापडला.

खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप (वय १०) हा मित्रांसमवेत दुपारी अडीच वाजता पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला.

ही घटना परिसरात समजताच सुनील खरात, दादू जगताप, बाळू जगताप, आदींनी शोध घेतला. अखेर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह सापडला.

पोलीस नाईक ढोकणे पोपट भोईटे यांनी त्यास दवाखान्यात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात एक भाऊ, तीन बहीणी, आई आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment