सावधान!आता परग्रहांवरून येईल नवा व्हायरस, तज्ज्ञांनी दिला इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कॅलिफोर्निया कोरोना विरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. लोकांना क्वारंटाइन केलं जातं असून वस्तू डिसइन्फेक्ट केल्या जात आहेत.

मात्र पृथ्वीवरील सध्याचा कोरोनाव्हायरसचा धोका पाहता परग्रहांवरही असे व्हायरस असावेत आणि तिथल्या नमुन्यांमार्फत पृथ्वीवर हे व्हायरस येऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

प्राध्यापक स्कॉट हबार्ड कि जे स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ञ् प्राध्यापक आहेत त्याच्या मतानुसार मंगळ ग्रहावरील दगडं लाखो वर्षे जुनी आहेत.

त्यामुळे तेथे सक्रिय जीव असू शकतात, ते जर पृथ्वीवर आले तर व्हायरसच्या रुपात पसरू शकतात. सध्या आपण एका अदृश्य महासाथीशी लढत आहोत आणि भविष्यातही अशा समस्यांशी आपल्याला सामना करावा लागू शकतो.

परग्रहांवरूनही व्हायरस येऊ शकतात त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगली पाहिजे असा त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. ते म्हणतात प्लनेटरी प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे.

मंगळ ग्रहांवरून पृथ्वीवर आणले जाणारे आणण्यात येणारे मातीचे नमुने म्हणजे एखाद्या धोकादायक व्हायरसला आमंत्रण असू शकतात.

त्यामुळे ते सुरक्षित असल्याचं सिद्ध होत नाहीत तोपर्यंत एखाद्या व्हायरसप्रमाणेच त्यांच्यावर काम व्हावं. शिवाय अंतराळ मोहिमेत वापरण्यात येणारे रॉकेट्स आणि इतर उपकरणंही डिसइन्फेक्ट करावीत.

तसंच अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनाही क्वारंटाइन केलं जावं. पहिल्या चंद्र मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या अपोला यांना असच क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

Leave a Comment