आज राज्यात सापडले ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५  नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत

तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६,

पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३,  ठाण्यात २,  रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१  रुग्ण आहेत तर २७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)

ठाणे: १४० (३)

ठाणे मनपा: १००४ (११)

नवी मुंबई मनपा: ९५५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)

उल्हासनगर मनपा: ५३

भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)

मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)

पालघर: ३८ (२)

वसई विरार मनपा: २६३ (१०)

रायगड: १२९ (२)

पनवेल मनपा: १४६ (८)

ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)

नाशिक: ८२

नाशिक मनपा: ४३

मालेगाव मनपा:  ६१६ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: १०

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ५४ (३)

जळगाव: १५२ (१५)

जळगाव मनपा: ४० (९)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)

पुणे: १६७ (५)

पुणे मनपा: २६२१ (१५५)

पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: ३०८ (१९)

सातारा: १२३ (२)

पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ५५ (२)

कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)

औरंगाबाद:९४

औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)

जालना: १६

हिंगोली: ६१

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)

लातूर: २६ (१)

लातूर मनपा: ५

उस्मानाबाद: ४

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ४२ (४)

लातूर मंडळ एकूण: ८२ (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १५१ (११)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ८४ (११)

यवतमाळ: ९८

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)

नागपूर: २

नागपूर मनपा: २६६ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २४ हजार ४२७  (९२१)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून आय सी एम आर पोर्टलनुसार अहवाल देण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा अहवाल दिनांक ११ मे २०२० दुपारी २.०० ते मध्यरात्री ११.५९ पर्यंतचा आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment