अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग हॉटस्पॉट घोषित !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अहमदनगर शहरात दोन दिवसांत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, शहरातील काही परिसर मध्यरात्रीपासून “हॉट स्पॉट’ करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट,पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चोक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.4, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस स्टेशन,जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर-पश्चिम बाजू,

हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट येथे हॉटस्पॉट पॉकेट घोषित करण्यात आले आहे.या परिसरातील नागरिकांना उद्या (गुरुवारी) सकाळपासून महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक वस्तू पुरविणार आहे.

या परिसरातील सुभेदार गल्लीत मंगळवारी (ता. 12) एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल काल प्राप्त झाले.

यात आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. मंगळवार दुपारपासून हा परिसर “सील’ आहे.अहवाल प्राप्त होताच रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडी गेट परिसराची पाहणी केली.

या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा परिसर “हॉट स्पॉट’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment