अंड्यांच्या टरफलांचा वापर करून हजारो रुपयांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंडे हे सर्वांना परिचित आहेत. देशात सर्वात जास्त खाल्ला जाणार्‍या पदार्थांपैकी अंडे हे एक आहे. या अंड्यांमधून लाखोंची उलाढाल होत असते.

परंतु याच्या टरफल्यापासून हाजोरींची उलाढाल होते असे संगितले तर आपला विश्वास बसेल ? परंतु हे खर आहे. छत्तीसगढ येथील सरगुजा जिल्ह्यातील महिलांनी अंड्याची टरफले उपयोगात आणण्याची अभिनव कल्पना शोधून काढली आहे.

इतकेच नव्हे, तर ही कल्पना उपयोगात आणून या महिला त्याद्वारे हजारो रुपयांची कमाई करीत आहेत. अंड्यांची टरफले वापरून या महिला कॅल्शियम पावडर आणि खते तयार करीत आहेत.

पर्यावरणवादी सी श्रीनिवास यांनी या महिलांना प्रशिक्षित केले आहे. स्थानिक प्रशासनाने या महिलांना सहकार्य केले आहे. अंड्याच्या टरफलापासून तयार केली गेलेली कॅल्शियम पावडर २०० रुपये प्रति किलो, तर खते ६०० रुपये प्रतिकिलोच्या भावाने विकली जात आहेत.

अंड्याच्या टरफलापासून कॅल्शियम पावडर आणि खते तयार करण्यासाठी अंड्याची टरफले आधी पाण्याने स्वच्छ धुतली जातात. त्यानंतर ही टरफले कडक उन्हामध्ये पूर्णपणे वाळविली जातात.

त्यानंतर टरफलांचा चुरा केला जातो. चुरा केल्यानंतर बारीक चाळणीतून हा चुरा चालण्यात येतो. अश्या रीतीने कॅल्शियमची पावडर तयार केली जाते.

अशी ही एक किलो पावडर एक क्विन्टल कोंबड्यांच्या दाण्यांमध्ये मिसळली जाऊन हे दाणे कोंबड्यांना खाऊ घातले जातात. त्यामुळे त्यांची कॅल्शियमची गरज पूर्ण होते.

या उपक्रमामध्ये स्थानिक प्रशासनासोबतच पशुपालन मंत्रालयाकडूनही सहाय्य मिळत आहे. अश्या रीतीने कचरा म्हणून फेकून दिली जाणारी अंड्यांची टरफले उपयोगात आणली जात आहेत,

व त्याचसोबत महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधनही मिळाले आहे.कोंबड्यांच्या दाण्यामध्ये मिसळण्याखेरीज अंड्यांची टरफले फुलझाडे आणि इतर पिकांकरिता खते म्हणूनही वापरली जात आहेत.

Leave a Comment