राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून महाराष्ट्रात कोरोनाने आपले थैमान सुरूच ठेवले आहे.

त्यामुळे पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार सुरु केला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,पुणे, औरंगाबाद व इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती.

ज्यामध्ये 975 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 15,747 रुग्ण असून 596 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार व्यक्त केला आहे.

हे भाग कोरोनामुळे अत्यंत प्रभावित झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या ठिकाणांवर प्रतिबंध वाढविण्यासदंर्भात चर्चा झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने 31 मेपर्यंत मुंबई एमएमआर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लवकरच राज्याचा विचार केंद्राला लिखित स्वरुपात दिला जाणार आहे.

Leave a Comment