रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतातच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  निलेश राणे आणि आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाले आहे. “साखर कारखाना, कुक्कुटपालन” या दोन शब्दांना घेऊन ते एकमेकांना टोले लगावताना दिसत आहेत.

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. यानंतर रोहित पवार यांनी निलेश राणे यांना रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेला उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.

साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.

रोहित पवार यांना प्रत्युत्तर देताना निलेश राणे म्हणाले आहेत की, हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? रोहित पवारांना शेंबडे म्हणत राणेंनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

महाराष्ट्राची संपत्ती मोठ्या प्रमाणात जर एकाच दिशेने जात असेल तर प्रश्न विचारायचे नाही का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय. असेही राणे म्हणाले आहेत.

या दोन तरुण नेत्यांत ट्विटर युद्ध सुरु झाले असून, उत्तराला प्रत्युत्तर देताना, एकेरी उल्लेख करत, हमरीतुमरीवर आले आहेत. रोहित यांनी `कुक्कुटपालन` हा शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरला होता. त्यावरून हा वाद पेटला.

प्रश्न साखरेचा आणि चर्चा कुक्कुटपालनवर गेल्याने मग सोशल मिडियातही त्यावर चर्चा सुरू झाली. आपापल्या नेत्यांचे समर्थक मग या ट्विटर युद्धात उतरले. दोन्ही बाजूंनी शेलक्या शब्दांत प्रश्न आणि उत्तरे दिसून येत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment