आपल्या घरातील ‘ही’ भाजी आहे सर्व जीवसनसत्वांची खाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण आहारात अनेक भाज्यांचा समावेश करतो. त्यापैकी शेवग्याच्या शेंगा ही भाजी नेहमीच खातो. परंतु ही भाजी म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींची खाणं आहे हे मात्र खूपच कमी लोकांना माहित असते.

हि भाजी शरीरासाठी थंड असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. यात खास जीवनसत्त्व असतात जे आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या वाढीसाठी अति गरजेचे मानले जातात. जाणून घेऊयात या विषयी.

जीवनसत्त्व ‘अ’ शरीराला अ जीवनसत्वे आवश्यक असतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोही राहते. जीवनसत्त्व ‘अ’ हे डोळ्यातील रेटीनाचा भाग चांगल्या स्थितीत ठेवून डोळ्यांच्या अनेक प्रकारच्या रोगांपासूनही आपल्याला दूर ठेवते.

शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ‘अ’ चे प्रमाण आढळते. यासाठी जीवनसत्त्व ‘अ’ वाढवण्याकरता शेवग्याच्या शेंगांचा समावेश आहारात जरूर करावा. जीवनसत्त्व ‘क’ जीवनसत्त्व ‘क’ ची आपल्या शरीराला आणि आरोग्याला मोठी गरज आहे.

आपल्या शरीरातील विविध प्रकारची कार्यप्रणाली उत्तम स्थितीत राहावी म्हणून जीवनसत्त्व ‘क’ प्रभावी रुपात कार्य करते. शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्व ‘क’ ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते, आणि त्याचे सेवन केल्यास स्कर्वी रोग आणि त्वचा रोगापासून आपला बचाव होतो.

जीवनसत्त्व ‘ब’ कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व ‘ब’ कॉम्पलेक्स आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतो. याची कमतरता भासू लागल्यास सगळ्यात पहिला प्रभाव हा केसांवर होतो आणि केस गळती सुरु होते.

मात्र ही कमतरता तुम्ही भरून काढू शकता शेवग्याच्या शेंगांचे सेवन करून! शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्व ‘ब’ समूहातील अनेक जीवनसत्त्वे असतात. तुम्ही यांचे सेवन भाजीच्या रुपात करू शकता किंवा त्यांना फ्राय करून स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता.

या शिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्व ब कॉम्पलेक्सला पूरक असणारी खनिजे सुद्धा असतात. कॅल्शियम हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयासोबत त्या हाडांना आजारांशी लढता यावं म्हणून शरीरात कॅल्शियम असणं गरजेच आहे.

जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असले तर त्या व्यक्तीला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

त्या व्यक्तीचं आयुष्य सामान्य व्यक्तींच्या आयुष्यासारखं राहत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण राखण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे.

या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश आवर्जुन करावा कारण शेवग्याच्या शेंगा ह्या कॅल्शियमने अतिशय समृद्ध असतात. पोटॅशियम इतर सर्व जीवनसत्त्व आणि घटकांप्रमाणे पोटॅशियम सुद्धा शरीरासाठी अत्यंत गरजेचा असणारा घटक आहे.

मांसपेशींच्या नसा निरोगी राखण्यासाठी आणि त्याचे कार्य उत्तम प्रकारे राखले जावे यासाठी पोटॅशियमचे सेवन अतिशय गरजेचे मानले जाते. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीही पोटॅशियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

तर असे हे पोटॅशियम शेवग्याच्या शेगांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची पर्याप्त मात्रा नसेल तर तुम्ही आवर्जुन शेवग्याच्या शेंगाचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे.

Leave a Comment