हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे,

तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका निर्माण झालेला आहे. तरी या वाहनांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी मख्यमंर्त्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यात त्यांनी नमूद केले आहे की, नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजारचा आदर्श घेऊन देशातील अनेक खेडे हे आदर्श बनत आहेत. या गावाला जगभरातून लोक भेटी देण्यासाठी नेहमीच येत असतात. आजपर्यंत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि एकीने या गावाची वाटचाल सुरु आहे. शासनाच्या सर्वच विभागांनी गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केलेले आहे व करत आहेत.

अवैध वाहतुकीबाबत ग्रामस्थांनी चालकास समजावले असता त्यांच्याकडून अरेरावीची व धमकीची भाषा वापरली जात आहे व ते उघड उघड पोलिस व महसूल विभागाची यंत्रणा आमच्या पाठीशी आहे. तुम्ही कोणाकडेही गेलात तरी आमचे काहीच वाकडे होणार नाही. अशी भाषा वापरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

याबाबत ग्रामस्थांनी माझ्याकडे वेळोवेळी तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. तसेच शेजारील ज्या गावातून ही वाहने येतात त्यांनी देखील वेळोवेळी मला तोंडी येऊन याबाबत कल्पना दिलेली आहे.

त्यानंतर आम्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करून देखील या अवैध वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा आळा बसलेला नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून हिवरे बाजारचे नाव व लौकिकास बाधा निर्माण करणारी आहे. तसेच परिसरातील व शेजारील गावातील सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच निर्बंध आणावा. सदरची अवैध वाहतूक हि ज्या परिसरातून केली जाते ती गावे हि नगर तहसील कार्यालय, एम.आय. डी.सी. पोलीस स्टेशन. नगर तालुका पोलीस स्टेशन यांच्या कार्यक्षेत्रातील आहेत.

या परिसरात कार्यरत असलेले कर्मचारी व त्यांचे वरिष्ठ यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.तरी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित सर्वांवरच योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, आणि हिवरे बाजार व परिसरातील नागरिकांचे संरंक्षण करावे. अशी मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment