पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे, दि. 17 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे  902  क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार  94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.

विभागात 1  हजार 548  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 1 हजार 41 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 16 मे 2020 रोजी 99.858 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.923 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे.

तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Leave a Comment