अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- बीड जिल्ह्यात आढळलेल्या मात्र मुळच्या अहमदनगर जिल्ह्याच्या असलेल्या 7 कोरोनाग्रस्तापैकी एका 65 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. कोरोनामुळे बळी गेलेला बीड जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे.
जिल्हा रुग्णालयातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा आज (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. हे सात जणांचं कुटुंब मुंबईहून बीड जिल्ह्यात दाखल झाले होते.
पाटण सांगवी हे या कुटुंबातील सुनेचं माहेर घर होते. हे कुटुंब मुळचे पिंपळगाव कौडा (ता:नगर,अहमदनगर) येथील रहीवासी होते.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 9 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हा पहिला मृत्यू झालेला आहे. उर्वरित आठ जणांवर उपचार सुरु आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com