कोरडा खोकला येतोय ? करा हे घरघुती उपाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-वातावरण बदलले किंवा वातावरणातील प्रदूषण वाढले की सर्दी होते. त्यानंतर खोकला हा ठरलेलाच. बऱ्याचदा अनेक औषधे घेऊनही काहींना फरक पडत नाही.

खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे त्रासदायक असते. काही घरघुती उपाय करून आपण या त्रासांपासून मुक्त होऊ शकतो. परंतु इतर काही आजार असेल तर वैद्यकीय सल्ला महत्त्वाचाच.

 १) आलं आणि मीठ एकत्रित सेवनाने चांगला फायदा होऊ शकतो. या साठी 1 नग आलं घेऊन त्याला थोडंस मीठ लावून त्याचे सेवन करावे. या उपायामुळे आपला खोकलाही बरा होऊन घसा देखील स्वच्छ होईल.

२) ज्येष्ठमधाचा चहा आपल्याला कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवून देऊ शकतो.

३) कोरड्या खोकल्यापासून पूर्णपणे बरं होण्यासाठी हळदीचे दूध अत्यंत प्रभावी असते. रात्री झोपण्याच्या आधी ते घ्यावे.

४)  कोमट पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील चयापचय दर वाढतो, त्यापेक्षा कोमटपाणी कोरडा खोकला दूर करण्यास प्रभावी आहे. दिवसांतून 3 वेळा कोमट पाणी प्यायल्याने खोकल्यावर त्वरित आराम मिळू शकतो.

 ५) वाफ घेतल्याने आपणास द्रुत आणि प्रभावी परिणाम मिळतात. गरम पाण्याची वाफ घेणे हा एक सोपा आणि घरघुती उपाय आहे. आपण कधीही ते करू शकता. घश्यात होणारी खवं-खवं आणि थंडपणावर त्वरीत आराम होतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment