जाणून घ्या वारंवार पिंपल्स येण्याची कारणे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सध्या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये सुंदर दिसणे खूप इम्पॉर्टन्ट मानले जाते. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हजारो रुपयांचे सौंदर्य प्रसाधने वापरली जातात.

परंतु तरुण तरुणींना बऱ्याचदा पिंपल्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा या युवा वर्गामध्ये नैराश्य देखील येते. त्यामुळे हे कशामुळे होते याचे मूळ कारण आपण समजावून घेऊया. म्हणजे  त्यावर उपाययोजना करता येतील.

 १) हार्मोनल बदल

शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात.  शरीरातील अँन्ड्रोजेन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हार्मोनल बदल दिसू लागतात. स्त्रियांकरिता साधारणतः हार्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्येही होत असतात.

२)मसालेदार पदार्थ  

तिखट, चमचमीत मसालेदार पदार्थांचे, तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे.

संत्री, द्राक्ष या फळांचा आहार घेतल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. त्वचेच्या तैलग्रंथी उत्तेजीत होऊन पिंपल्सची समस्या वाढत जाते.

३) चुकीची सौंदर्य प्रसाधने वापरणे

 आजकाल मुलांना असो अथवा मुलींना मेकअप करायला खूप आवडतं. त्यासाठी वेगवेगळी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली जातात.

या स्टिरॉईड औषधांचा एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी पडते. तो गोरेपणा नसतो. या क्रीममुळे पिंपल्स वाढतात. केमिकल्स त्वचेवर सुट न झाल्यामुळे पिंपल्स येतात.

४)  व्यायामाचा अभाव

घरी बसल्यामुळे अनेकांची  पुरेशी हालचाल होत नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. परिणामी शरीरातील घातक नको असलेले पदार्थ शरीराबाहेर पडत नाही.

त्यामुळे त्वचेतून पिंपल्सच्या माध्यामातून शरीरातील नको असलेलं पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित नसणं हे पिंपल्स येण्याचे कारण असू शकतं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment