कोरोनावर लस आली ? ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वॉशिंग्टन कोरोनाच्या थैमानानंतर संपूर्ण जग एकवटून यावर लस शोधत आहे. अनेक ठिकाणी याचा ट्रायलदेखील सुरु आहेत. आता अमेरिकेतून एक खुशखबर येत आहे.

अमेरिकेतल्या एका कंपनीने तयार केलेल्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. तसेच टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत.

सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे असं ते म्हणाले. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतल्या मॉडर्ना इंक कंपनीनं (Moderna Inc) तयार केलेल्या mRNA-1273 लसीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.

या लसीतील अँटिबॉडीज कोरोनाव्हारसला निष्क्रिय करत असल्याचं दिसून आलं आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यातील अँटिबॉडीजप्रमाणेच ही लस दिलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या.

या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना तीन वेगवेगळे डोस देण्यात आले. या डोसनुसार व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचं दिसून आलं.

ही लस तयार करण्यासाठी व्हायरसचा वापर केलेला नाही तर कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. ही लस सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आता पुढील चाचणी जुलैमध्ये करण्याचा कंपनीचा विचार आहे.

Leave a Comment