चालण्याचा व्यायाम केलात तर ‘हे’होतील आश्चर्यकारक फायदे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण चालणे विसरलो आहोत. वेळ वाचवण्यासाठी आपण विविध वाहनांचा वापर करतो. त्यामुळे आपले चालणे कमी झाले आहे. परिणामी लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर तुमची जीवनशैली बदला. दररोज चालणे आपल्याला हृदय आणि सांध्यासह अनेक जुनाट आजारांपासून मुक्ती देऊ शकते.

१) वजन नियंत्रण आपण आपले वजन कमी करू इच्छित असाल आणि आपले शरीर निरोगी ठेवू इच्छित असाल तर नियमितपणे चालण्याची सवय लावा.

बाजारात जाण्यासाठी किंवा आसपासच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कार किंवा दुचाकी वापरणे टाळा. आपण जितके चालाल तेव्हडे आपले वजन नियंत्रणात राहील.

२) मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर शुगर हा एक आजार आहे, जो आजकाल लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या रोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही दररोज 3000 ते 7500 पावलं चाललात तर तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील. जर मधुमेह रूग्णांना साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर चालण्याचा व्यायाम करा.

३) पचनक्रिया सुधारते जर आपण जेवण केल्या केल्या झोपलो तर आपले पचन नीट होत नाही. परिणामी बद्धकोष्ठता, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, अतिसार यासारख्या तक्रारी वाढू लागतात. पचन सुधारण्यासाठी चालण्याचा व्यायाम करा, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहील.

४) नैराश्य दूर होते चालल्यामुळे पेशींना भरपूर ऑक्सिजन मिळतो. यामुळे तणावाची पातळी कमी होते. जेव्हा आपण चालतो तेव्हा चालताना आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो, यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तर जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर घराबाहेर चालण्यास सुरवात करा.

५) स्मरणशक्ती वाढेल जर आपल्याला डिमेंशिया किंवा विसरण्याचा आजार असेल तर चालण्याची सवय लावा. चालण्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment