मुख्‍यमंत्री घरातून बाहेर पडत नसल्याने सरकारचा कारभारही फेसबुकवरच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोवीड-१९ च्‍या संकटात राज्‍यातील जनतेला दिलासा देण्‍यात राज्‍य सरकार अपयशी ठरले असुन, सरकारचा कारभार फक्‍त फेसबुकवर सुरु आहे. मंत्रीच मुंबईत जावून बसल्‍याने शेतकरी आणि सामान्‍य माणसांच्‍या समस्‍या वाढण्‍यास सरकारच जबाबदार असल्‍याचा

थेट आरोप करुन, केंद्र सरकारने जाहीर केलेल्‍या पॅकेजवर टिका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला मदत जाहीर करा अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

राज्‍य सरकारच्‍या नाकर्तेपणा विरोधात भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने राहाता तहसिल कार्यालयात तहसिलदारांना विविध मागण्‍यांचे निवेदन देवून महाराष्‍ट्र बचाव आंदोलनाचा इशारा देण्‍यात आला.

राज्‍य सरकारच्‍या नाकर्तेपणाचा निषेध करण्‍यासाठी विविध मागण्‍यांचे निवेदन सादर केले असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, कोवीड-१९ च्‍या या महाभंयकर संकटात जनतेला दिलासा कोणताही दिलासा राज्‍य सरकार देवू शकलेले नाही.

राज्‍याच्‍या नेतृत्‍वाचे सामान्‍य माणसांच्‍या प्रश्‍नांकडे अक्षम्‍य दुर्लक्ष झाले असुन, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात दिलेला निधी राज्‍य सरकार खर्च करु शकले नाही ही वस्‍तुस्थिती असल्‍याचे त्‍यांनी निदर्शनास आणुन दिले.

राज्‍याचे मुख्‍यमंत्री घरातून बाहेर न पडता फक्‍त फेसबुकवरच संवाद साधत असुन सरकारचा कारभारही फेसबुकवरच सुरु असल्‍याची टिका करुन त्‍यांनी सांगितले की, ठराविक मर्जितील आधिका-यांच्‍या बदल्‍या करण्‍यामध्‍ये सरकार आघाडीवर आहे.

विविध विभागांचे मंत्री जिल्‍ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसुन राहील्‍याने शेतक-यांचे आणि सामान्‍य माणसांचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहे. राज्‍यातून परप्रांतिय नागरीक मोठ्या संख्‍येने जात असताना राज्‍याच्‍या हद्दीपर्यंत कोणतीही मदत केंद्र सरकार उभारु शकल नाही,

एकही मंत्री त्‍यांच्‍यापर्यंत पोहचला नाही. शेतक-यांचे हाल तर मोठ्या प्रमाणात झाले आहेत, कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला. एकाही मंत्र्यांने शेतक-यांच्‍या किंवा सामान्‍य माणसाच्‍या प्रश्‍नांवर बैठक घेतली नाही त्‍यामुळे शेतकरी आणि जनता वा-यावर आहे.

ही संपुर्ण परिस्थिती सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देत असल्‍यामुळेच या कृत्‍याचा निषेध म्‍हणून आज हे निवेदन दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर राहात्‍याच्‍या नगराध्‍यक्षा सौ.ममता पिपाडा, सभापती नंदाताई तांबे, सभापती रायभान आहेर, गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, व्‍हा.चेअरमन प्रतापराव जगताप,

डॉ.राजेंद्र पिपाडा, उपसभापती ओमेश जपे,नितीने कोते, भारतीय जनता पक्षाचे शिर्डीचे उपाध्‍यक्ष रविंद्र कोते, नंदकुमार जेजूरकर आदिंनी सोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन तहसिलदारांना आपल्‍या मागण्‍यांचे निवेदन सादर केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment