भावानेच केला भावाचा कुऱ्हाडीने खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  जिंतुर तालुक्यातील सायखेडा येथे भावानेच किरकोळ भांडणातून भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेषेराव किसनराव जाधव असे मृताचे नाव आहे.मृताची पत्नी सावित्रीबाई शेषेराव जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी , घरासमोरील कडबा शेळीने खाल्ल्याने त्यांच्यात वाद झाला.

त्यानंतर शेषेराव आपल्या आईला आपल्या भावाच्या घरासमोरुन जेवण करण्यासाठी घेऊन जात असताना रामराव यांनी आपल्या हातात कुऱ्हाड घेतली आणि ‘माझ्या घरासमोरुन जायचे नाही, असे म्हणत शेषेरावशी भांडण केले.

भांडण वाढत जाताच रागाच्या भरात रामराव यांनी हातातील कुऱ्हाडीने शेषेराव यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

शेषेराव यांच्या मुलाने त्यांना जिंतुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

परभणी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शेषेराव यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment