सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असुन, मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करण्‍यात आले. शिर्डी मतदार संघातील सर्वच गावांमध्‍ये कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या घराच्‍या अंगणात महाराष्‍ट्र बचाव आंदोलन करुन आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणाचा मास्‍क बांधुन आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोणी बुद्रूक येथे झालेल्‍या आंदोलनात माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, चेअरमन नंदु राठी,सोसायटीचे चेअरमन चांगदेव विखे, सरपंच लक्ष्‍मण बनसोडे,उपसरपंच अनिल विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्‍य अनिल विखे याप्रसंगी उपस्थित होते.

या आंदोलनानंतर माध्‍यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, राज्‍यात कोरोना संकटाचे भिषण वास्‍तव अधिक वाढत आहे. या संकटातून राज्‍याला वा‍चविण्‍यात सरकार पुर्णत: अपयशी ठरल्‍यामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या ४१ हजारांपर्यंत जावून पोहचली असल्‍याकडे लक्ष वेधून, केंद्र सरकारच्‍या  मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी राज्‍य सरकारने जाणीवपुर्वक केली नाही. केंद्र सरकारच्‍या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहचवू शकले नसल्‍याने सरकारच्‍या या हलगर्जीपणामुळेच सर्वसामान्‍य नागरीक मृत्‍युच्‍या खाईत लोटला गेला असल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी केला.

राज्‍यात पाहाणी करण्‍यासाठी आलेल्‍या केंद्रीय समितीने ७६ हजार बेडची उपलब्‍धता करण्‍याची सुचना सरकारला केली होती. परंतू आघाडी सरकार फक्‍त तात्‍पुरत्‍या उपाय योजना करत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलिस दलापर्यंत पोहचले नाहीत. उलट पोलिसांवर हल्‍ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्‍त बघ्‍याची भूमिका घेतली. परप्रांतीय कामगारांना त्‍यांच्‍या राज्‍यात पाठविताना आघाडी सरकार अतिशय असंवेदनशिल वागले. महाराष्‍ट्राच्‍या हद्दीपर्यंत सरकारने मदत केंद्र उभी करायला हवी होती पण सरकार तेही करु शकले नाही अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कोरोना संकटातच शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या झाल्‍या याचेही सरकारला भान राहीले नाही. हे सरकार जनतेत दिसण्‍यापेक्षा व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर अधिक दिसते, फक्‍त फेसबुकवर संवाद साधते, या सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन हे केवळ आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असल्‍याची टिका करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, केंद्र सरकारच्‍या २० लाख कोटी रुपयांच्‍या पॅकेजवर टिका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला तुम्‍ही काय देणार?असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेसच्‍या प्रदेशअध्‍यक्षांनी भाजपच्‍या आंदोलनावर केलेल्‍या टिकेचा समाचार घेताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, कॉंग्रेसचे अस्तित्‍वच आता कुठे दिसत नाही त्‍यामुळे त्‍यांनी भाजपची चिंता करु नये, नगर जिल्‍ह्यात सरकारचे तीन मंत्री असतानाही जिल्‍ह्यातील जनतेला हे दिलासा देवू शकले नाहीत,    शेतक-यांसह जिल्‍ह्यातील जनता यांनी वा-यावर सोडली असल्‍याचे ते म्‍हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment