मुस्लिम बांधव घरातच ईदची नमाज करणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाच्या सर्व सूचना पाळुन पाथर्डी तालुक्यात रमजान ईद सणाची नमाज घरातच अदा करण्यात येईल.

माणुसकी धर्माचे पालन करुन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वांनुमते घेण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी तालुक्यातील मौलाना व मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पोलिस ठाण्यात शनिवारी झाली.

पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, मौलाना सैफुउद्दीन शेख, शफीक शेख,हापीज जमील, समीर पठाण, अस्लम सय्यद, मंहमद शेख, रफीक शेख, नासीरभाई शेख, अस्पाक खलीफा, अलीम पटेल,

अक्रम आतार, फिरोज पठाण, मुन्ना खलीफा, इलियास शेख,हापीज अहमंद ,गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप यांच्यासह तालुक्यातील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

यावेळी पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे म्हणाले, कोरोना रोगाची साथ सुरु आहे. सरकारने सर्वधर्मीय धार्मिक कार्यक्रमावर बंदी आणलेली आहे. सराकारचे नियम पाळले जावेत.

आपण जे करतो ते सर्वांसाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी करीत आहोत. त्यामुळे सामूहिक ठिकाणी एकत्रीत येणे व नमाज पडण्याविषयी जागृती करण्यासाठी ही बैठक होत आहे.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी नगर येथे बैठक घेवुन तशा सुचना दिलेल्या आहेत. यावेळी तालुक्यातून आलेल्या सर्व मुस्लिम धर्माचे मौलाना व विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी आम्ही घरातच नमाज पठण करु व एकत्रीत येणार नाहीत.

ही नैसर्गिक आपत्ती आहे यामधे सर्वांनीच सामूहिक मुकाबला करण्याची गरज आहे. जोडणारा धर्म श्रेष्ठ असतो तो सर्वजण पाळतील असा निर्णय घेतला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment