अजित पवारांविषयी संजय राऊत यांनी वापरले ‘हे’शब्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- विधानपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या शाब्दिक युद्धामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिली. या भेटीमुळे संजय राऊत चांगलेच चर्चेत होते. या भेटीनंतर संजय राऊत यांनी अजित पवारांविषयी केलेल्या एका उल्लेखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राज्यपालांना भेटून बाहेर पडल्यानंतर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना घेरले. त्यावेळी राऊत यांनी पत्रकारांना लांब राहण्याची सूचना केली.

त्यांनी म्हटले की, अजित पवार काल म्हणालेत बूम (माईक) लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असे ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर शब्दावर विशेष जोर दिला.

त्यामुळे पत्रकारांमध्ये अजितदादांच्या अशा उल्लेखाविषयी चर्चा रंगली होती. आता राऊत यांचे वक्तव्य केवळ गंमत होती की टोमणा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काल अजित पवार यांनी पुण्याच्या स्मार्ट सिटी कार्यालयात उभारलेल्या वॉर रुमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता.

यानंतर अजितदादा नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी बोलतील या आशेने पत्रकार त्यांच्यापाशी माईक घेऊन गेले. तेव्हा अजितदादांनी त्यांना दुरुनच नमस्कार केला. तसेच बूम (माईक) जवळ आणू नका त्याने कोरोना होतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment