मोठी बातमी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव , कोरोनाबाधित महिला रुग्ण सापडली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस आज नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

ठाणे येथून श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वानवळा आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान  त्या महिलेचा मुलगा व सुनेच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

ती महिला पतीसोबत ठाणे येथे राहत होती. तिच्या पतीचे कोरोनाने ८ मे रोजी निधन झाले. या महिलेची ठाण्यात महापालिका प्रशासनाने तपासणी केली होती.

वैद्यकीय अहवाल येण्याअगोदरच ती चिखली येथे माहेरी आली होती. माहेरी मुलगा व सुनेबरोबर राहिली. या महिलेच्या ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या तीन चाचण्या घेतल्या होत्या.

महिलेची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडे ठाणे महापालिकेने तिचा अहवाल पाठविला आहे. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

या महिलेसह तिचा मुलगा व सुनेला नगरला क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या तीन व्यक्तीच्या संपर्कात चिखलीतील कोणीच आले, याची चौकशी सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment