हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे.

सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

मंत्री गडाख यांनी रविवारी प्रवरासंगम व देवगड परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली व दर्शन घेतले.

तसेच परिसरात समस्या जाणून घेतल्या व तसेच व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या व परवानगी असलेली दुकाने फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत सुरू करा, असे सांगितले.

मंत्री गडाख यांनी फिजिकल डिस्टन्सिंग राखत, मास्क वापरुन प्रवरासंगम येथे झाडाखाली, सोसायटीच्या प्रांगणात लांब खुर्च्या ठेवून ही बैठक घेतली.

ते म्हणाले, नागरिकांनी सुरक्षितता बाळगली तर आरोग्य, महसूल , पोलिस यंत्रणेवर पडणारा ताण तणाव कमी होईल. ते देखील आपल्यासारखीच माणसे आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment