अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळून आले होते.

त्यामुळे रुग्णाला दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. कालच तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

दरम्यान काल दि. 25 रोजी रात्री ती मयत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

त्यामुळे, संगमनेरमध्ये कोरोना बाधित मयतांची संख्या चार झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी एका महिला संगमनेरमध्ये आली होती.

ती मुंबईला  आजारी असल्यामुळे तिच्या भावाने तिला संगमनेरात आणले होते. दरम्यान प्रवासात तिला जास्त त्रास होऊ लागला होता.

त्यामुळे ते जेव्हा संगमनेरात आले तेव्हा तिला भावाने एका खासगी रुग्णालयात दाखविले.

डॉक्टरांनी तत्काळ तिला जिल्हा रूग्णालयात हलविले होते.  तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होंता.

काल सायंकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment