लॉकडाऊनचे उल्लंघन करत भाजप खासदाराचा क्रिकेटचा खेळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही भाजप खासदार आणि दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी क्रिकेट खेळत आहेत.रविवारी हरयाणाच्या सोनीपत शहरात क्रिकेट खेळताना दिसले.

या घटनेचे फोटो आणि व्हिडेओ व्हायरल झाल्यानंतर सोनीपत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. देशात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आले आहेत.

असे असले तरी सत्ताधारी भाजप खासदाराने लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे. खासदार मनोज तिवारी रविवारी हरयाणाच्या सोनीपत शहरात क्रिकेट खेळताना दिसले.

त्यांनी यावेळी मास्कही घातले नव्हते. तसेच क्रिकेट खेळताना सोशल डिस्टसिंगचा चांगलाच फज्जा उडाला होता. या दरम्यान त्यांनी उपस्थितांना गाणेही गाऊन दाखवले. क्रिकेट खेळताना खासदार तिवारींनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

देव तुम्हाला सगळ्यांना चांगले आरोग्य देवो, सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment