अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला…ही हत्या आहे की आत्महत्या तपास पोलिसांकडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी व रांजणीलगत डोंगरात सोमवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे ५५ वर्षे असून चार दिवसांपासून हा मृतदेह तेथे असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या रांजणी येथील गुराख्याने हा मृतदेह पाहिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत लिंबाच्या झाडाखाली होता.

मृताजवळ दोन रग, पाण्याची बाटली, कपडे व एक मोबाइल आढळला. ही हत्या आहे की, आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.

सहायक निरीक्षक परमेश्वर जावळे, पोलिस देविदास बांगर, अतुल शेळके, आर. के. रांजने, अप्पासाहेब वैद्य, अशोक काकडे, विजय इधाते यांच्यासह ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment