सुंठ खाल्ल्याने होतील ‘एवढे’ आजार दूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- सुंठ हा मसाल्याचा पदार्थ आपल्या घरात नेहमीच असतो. अगदी कोणत्याही भागात आणि सर्वसामान्यांकडे उपलब्ध होणार हा पदार्थ आहे. सुंठेचं सर्वाधिक उत्पादन भारत, नायजेरिया, चीन, कॅरेबियन, इंडोनेशियामध्ये  होतं.

प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे. या पदार्थाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. पूर्वीच्या काळी सुंठ खोकल्यावर रामबाण इलाज म्हणून वापरली जात होती. परंतु आज आम्ही तुम्हाला या सुंठीचे इतर अनेक फायदे सांगणार आहोत.

१) पोटाचे अनेक आजार बरे होतात –
गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या पोटाच्या समस्यांसाठी सुंठेचा उपयोगकेल्यास आराम पडू शकतो.   सुंठेत अॅन्टी-इन्फ्लेमेन्टरी तत्व असतात,

जे पोटाच्या समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. सुंठेच्या नियमित सेवनाने पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. सुंठेत असणारं अॅन्टी- इन्फ्लेमेन्टरी तत्व हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी करते.

२) रोगप्रतिकारशक्ती –
थंडीच्या दिवसांत इम्यून सिस्टम कमकुवत होते, परिणामी सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग करु शकता. खास करुन थंडीच्या दिवसांत याचं सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतं.

३) नैसर्गिक पेनकिलर –
एका संशोधनानुसार, सुंठ एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो.

४) डोकेदुखी –
डोकेदुखीवरही सुंठ आराम देते. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसारण सुरळित होतं. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने आणि रक्ताभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.

५) हृदयरोगांवर गुणकारी –
ड्राय जिंजरमुळे कोलेस्ट्रोल कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सुंठेमुळे शरीरात कोलेस्ट्रोलचं प्रमाण आणि ब्लड शुगर योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे हृदयासंदर्भात होणारे आजार दूर होतात.

६) गरोदर महिलांना फायदेशीर
एका संशोधनानुसार, गर्भावस्थेमध्ये सुंठेचा फायदा होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये गॅस, पोटासंबंधी अनेक समस्या होत असतात. अशावेळी सुंठ पावडर महिलांना पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते. सुंठेमुळे मॉर्निंग सिकनेस कमी होऊ शकतो.

७) मधुमेह –
आल्यामध्ये असलेले एक्टिव्ह कंपाउड्स इन्सुलिन आणि मेटाबॉलिज्म उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment