मिठी मारल्याने ‘हे’ होतील फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- आपण बऱ्याचदा जवळच्या व्यक्तीस भेटल्यानंतर एकमेकांना आलिंगन देतो.  यातून एकमेकांप्रती उच्चप्रतीचे प्रेम व्यक्त होते. परंतु याच मिठीचे काही महत्त्वपूर्म फायदेही आहेत.

आश्चर्य वाटलं ना ? परंतु हे अगदी खरं आहे.  जेव्हा पालक त्यांच्या मुलांना मिठी मारतात तेव्हा मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचं आकलन करण्यात अडचण येत नाही.

फॅमिली थेरेपिस्ट व्हर्जिनिया सॅटिर यांच्या म्हणण्यानुसार दर दिवशी आपण कमीत कमी चार वेळा मिठी मारणं आवश्यक आहे. काही राष्ट्रांमध्ये तर, कडलिस्ट असा एक नवा पेशाही समोर आला आहे. ज्यामध्ये पैसे आकारून लोकांना मिठी मारली जाते.  मिठी मारल्यामुळे मेंदूही तल्लख होतो.  जाणून  घेऊयात आणखी काही फायदे –

१) स्ट्रेस कमी होतो
मिठी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावापासून दूर राहता येतं. शिवाय एकटेपणाही सतावत नाही. आपण जेव्हा कोणाला मिठी मारतो तेव्हा स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टीसोलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे मानसिक शांतता मिळते.

२) हृदय निरोगी राहण्यास मदत होते
शरीरातील  स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टीसोलच रक्तदाब वाढवण्याचं काम करतात. ज्यामुळे हृयाचे विकार जडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत निरिक्षणातून हे सिद्ध झालं आहे की, दैनंदिन जीवनात मिठी मारल्यामुळे तुमच्यातील कॉर्टीसोलचं प्रमाण कमी होतं.

३) शरीराला आराम मिळतो –
कोणाही व्यक्तीला मिठी मारतेवेळी शरीरातील मांसपेशी पसरतात. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास मिठी मारल्यामुळे तोसुद्धा दूर पळून जातो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment