अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पुन्हा वाढले पाच कोरोना रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-  आज संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहेत, यात सिन्नर तालुक्यातील 56 वर्षीय व्यक्ती तर निमोण येथे 75 वर्षीय वृद्ध, तसेच भारत नगर येथील 54 वर्षीय महिलेचा सामावेश आहे.

तर सकाळी मोमिनपुरा येथील 71 वर्षीय वृद्ध तसेच भारतनगर येथील 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे

त्यामुळे, संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी पाच व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय.

आतापर्यंत संगमनेरमध्ये कोरोनामुळे एकूण पाच व्यक्ती चा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 37 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान शहरातील बाजारपेठेचा काही भाग प्रशासनाने बंद केला असेन तेेथे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.

त्यात मदिना नगर, भारत नगर, जुना जोर्वे रोड,  संगमनेर शहरातील भारत चौक., अशोक चौक, शिवाजी पुतळा परिसर,

मोेमीनपुरा व लगतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे, जवळपास अर्धी व महत्वाची बाजारपेठ आता बंद राहणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment