समृद्धी महामार्गाच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टीम अहमदनगर Live24, 30 मे 2020 :- कोपरगाव जेऊर कुंभारी भागात समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना लगतच्या विजेच्या खांबावरील तारांना चिकटून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी घडली.

या प्रकरणी समृद्धी महामार्गाच्या दोन नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विचारण्यात येत होता.

अखेर शहर पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या गली भास्कर (आंध्रप्रदेश, हल्ली समृध्दी महामार्ग कॅम्प कोपरगाव), हनुमंत रामकिसन गुटे (नांदगाव) या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावलेला नाही, तसेच सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. बॅरिकेडींग केलेले नाही. रस्त्याच्या मधोमध विजेच्या तारा गेलेल्या असून कोणाचाही सहज हात लागून मृत्यू होऊ शकतो,

हे माहिती असतानाही कोणतीही काळजी घेतली नाही, असा ठपका ठेवण्यात आला. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बोरसे पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment