मरकजचा कार्यक्रम रोखला असता, तर ही वेळ आली नसती; अमित शहा म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता.

त्यामुळे जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे करोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे.

त्यावेळी या कार्यक्रमामुळे सुमारे ३० टक्के कोरोना विषाणूचा फैलाव संपूर्ण देशात झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना योद्ध्यांवर झालेल्या हल्ल्याविषयी बोलताना शाह म्हणाले, “सरकार प्रत्येक करोना योद्ध्यासोबत आहे.

देशभरात अशा ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावलं उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment