कोरोनाचा उद्रेक: एकाच दिवशी आठ हजार रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-कोरोनाचा संसर्ग थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक उपाययोजनांच्या नंतरही रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

मागील २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ८,३८० नवे रुग्ण आढळले असून देशभरात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार १४३ इतकी झालेली आहे.

एका दिवसात पहिल्यांदाच ८ हजारचा आकडा पार झाला आहे. करोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला.

एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९,९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment