गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- आधीच कोरोनाने आर्थिक बजेट कोलमडले असताना सर्वसामन्यांच्या आणखी खिशाला चाट पडणार आहे. त्यानुसार मुंबईत विना अनुदानित एलपीजी गॅसची किंमत आधी 579 होती.

आता ही किंमत 590.50 रुपये किंमत झाली आहे. तर 19 किलो सिलिंडरची किंमत 1087.50 रुपये झाली आहे. IOC वेबसाइटवर दिलेल्या

किंमतीनुसार आता दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून 593 रुपये झाली आहे जी 581.50 रुपये होती.

त्याच वेळी कोलकातामध्ये 616.00 रुपये, मुंबईत 590.50 रुपये आणि चेन्नईत 606.50 रुपये झाली आहे. याआधी हीच किंमत अनुक्रमे 584.50, 579.00 आणि 569.50 रुपये होते.

तर, 19 किलो LPG सिलिंडरचे दरही वाढविण्यात आले आहेत, आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईत 19 किलो एलपीजी सिलिंडर 1.87.50 रुपये झाले आहे.

त्याचप्रमाणे कोलकातामध्ये त्याचे भाव वाढून 1193.50 रुपये, दिल्ली 1139.50 रुपये आणि चेन्नईत 1254.00 रुपये झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment