अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे खुले करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  लॉकडाऊन मुळे सध्या बंद असलेली  नगर शहरासह जिह्यातील मठ – मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी.

प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणीची ही संबंधित विश्वस्त – पुजारी यांच्याकडून घेऊन मंदिरे खुली करावीत असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केले आहे.

जिह्यात अनेक पुरातन, स्वयंभू व ऐतिहासिक वारसा लाभलेली देवस्थान आहेत.नगर जिल्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या मठ – मंदिर संपर्क समितीच्या वतीने

भाविकांना मठ – मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे व मठ – मंदिर संपर्क प्रमुख हरीभाऊ डोळसे यांनी मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे केली.

भाविकांसाठी मंदिर व्यवस्थपनाने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून दर्शन पास उपलब्ध करून द्यावेत. सोसिअल डिस्टन्स पाळून सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शन उपलब्ध करून द्यावे.

पौराहित्य पूजा पाठ करणारे गुरुजी व पूजेचे साहित्य विकणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत . या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करून धार्मिक कार्यास चालना द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment