‘या’ बँकेचे लोन झाले एकदम स्वस्त जाणून घ्या..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकतीच आपल्या व्याजदरात कपात केली. आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची असणारी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह कर्जे आणि वाहन कर्जे देणार आहे. पंजाब नॅशनल बँकने सोमवारी कर्जावरील रेपो दरात 0.40 टक्के सूट जाहीर केल्याने नवीन व्याजदर ७.०५ टक्क्यांवरून ६.६५ टक्के झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, घर किंवा कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी हा दर फारच कमी आहे. आता ग्राहकांना कर्जावरील कमी व्याजदराचा थेट लाभ मिळणार आहे.

बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की या व्यतिरिक्त सर्व परिपक्वता अवधीच्या कर्जासाठी आधारित व्याज दर एमसीएलआर आधारित ०.१५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. सुधारित दर १ जुलैपासून लागू होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment