‘या’ कपाटात वस्तू ठेवल्यास होणार व्हायरसमुक्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या विविध गोष्टीमार्फत कोरोनाचे व्हायरस पसरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी सॅनिटाइज करून घेण्याचा सल्ला तज्ञ् देत असतात. हे लक्षात घेऊन भारतातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक कपाट तयार केले आहे.

या कपाटात तुम्ही तुमच्या वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत. हे कपाट म्हणजे अल्ट्रा स्वच्छ, डिसइन्फेक्शन युनिट आहे. हे अल्ट्रा स्वच्छ ़डिसइन्फेक्शन युनिट तयार केलं आहे.

हे कॅबिनेट कॉन्टॅक्टलेस आहे. बटणमार्फत ते उघडलं जातं. यात ठेवलेल्या सामानावर अल्ट्रावॉयलेट लाइट्स पडून त्यांचं सॅनिटायझेशन होतं. सॅनिटायझेशन झाल्यानंतर हे कॅबिनेट आपोआप स्लीप मोडमध्ये जातं.

या युनिटमध्ये पीपीई सूट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवून त्या व्हायरसमुक्त करता येऊ शकतात. या युनिटचा वापर सरकारी कार्यालयांमध्येही होतो आहे.

डिआरडीओने याआधी एल्ट्रावॉयलेट लाइटवर आधारित कॅबिनेट तयार केलं होतं. ज्यात तुम्ही मोबाइल, लॅपटॉप, पैसे, कागद किंवा इतर अशा वस्तू ठेवून काही वेळातच व्हायरसमुक्त होतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment