धक्कादायक! १०० रुपये लाच घेऊन दिल जातंय आरोग्य प्रमाणपत्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणण्यासाठी ई-पास देण्यात येत आहे.

मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून घेणे आवश्यक आहे. परंतु कोणतीही चाचणी न करता १०० रुपये घेऊन

हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात घडत असल्याचे उघड झाले आहे.

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी (दि.२) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अहमदनगर महापालिकेच्या मुकुंदनगर येथील आरोग्य केंद्रात शब्बीर सय्यद हे आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र घेण्यासाठी दाखल झाले. त्यांना मुंबई येथे जायचे होते.

मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शब्बीर सय्यद यांची कोणतीही तपासणी न करता किंवा त्यांची काही आरोग्यविषयक चौकशी न करता फक्त नाव विचारले.

कोठे जायचे आहे ते विचारले आणि छापिल प्रमाणपत्रावर शब्बीर सय्यद यांचे पूर्ण नाव टाकून प्रमाणपत्र त्यांच्या हातात टेकवले. हे प्रमाणपत्र देताना १०० रुपयांची मागणी केली.

सय्यद यांनी संबंधित कर्मचा-याकडे १०० रुपये दिले आणि प्रमाणपत्र घेतले. कोरोनासारख्या महामारीतही आरोग्य यंत्रणा पैसे घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा हा प्रकार कॅमे-यात कैद झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment