‘सावधान! सॅनिटायझरच्या अतिवापराने उद्भवतील त्वचारोग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारची काळजी घेतली जाते. सध्या यावर लस उपलब्ध नसल्याने स्वरक्षण आणि स्वच्छता व सोशल डिस्टंस हे महत्वाचे नियम सांगितले आहेत.

त्यामुळे स्वच्छता राखण्यसाठी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे.

हाताला खाज येणे, पांढरे चट्टे उठणे आणि हात लाल होणे अशा त्वचाविषयक तक्रारी वाढल्या असल्याचे निरीक्षण त्वचारोगतज्ज्ञ यांनी नोंदविले आहे. सतत हात धुणे हा प्रतिबंधात्मक उपायामधील एक प्रमुख उपाय आहे.

त्यामुळे सॅनिटायझरचा वापर सर्रास केला जात आहे. सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरचा विक्रमी खप झाल्याने औषध दुकानात त्यांचा तुडवडा भासू लागला होता.

सध्या चांगल्या कंपन्यांच्या सॅनिटायझरबरोबर घरगुती जंतुनाशकांची विक्री जोरात सुरू आहे. सातत्याने सॅनिटायझरने हात धुण्याची आवश्यकता नाही, असे त्वचारोग डॉक्टर सांगत आहेत.

एकदा सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर त्याचा प्रभाव दोन ते तीन तास राहू शकतो. सतत जंतुनाशक अथवा साबण हाताला लावल्याने त्वचेचा पहिला नाजूक संरक्षक थर कमकुवत होत असून त्वचारोगांची समस्या उद्भवू लागल्या आहेत.

काही सॅनिटायझरमध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने त्वचारोगाची समस्या निर्माण होत असल्याचे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे त्वचारोग तज्ञ डॉ. दत्तात्रय सोनावणे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment