विनापरवानगी गावाकडे आलेला ‘तो’ तरुण कोरोना पॉझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील राणेगावमधील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो विनापरवानगी गावाकडे आला होता.

या रुग्णाच्या संपर्कातील 10 जणांना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे.

सदर तरुण हा कल्याणहून रविवारी सायंकाळी विनापरवानगी गावाकडे आला होता. रात्रभर तो गावात राहिला. मात्र त्याला खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने तो स्वत: हून जिल्हा रूग्णालयात सोमवारी दाखल झाला.

तपासणी नंतर सोमवारी रात्री त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे बेरड यांनी सांगितले. या तरूणाच्या संपर्कात आलेल्या 10 जणांना आज 108 रूग्णवाहिकेतून तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले,

तर त्या तरुणाच्या प्रथम संपर्कातील 16 व द्वितीय संपर्कातील 26 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment