आ. संग्राम जगताप यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ परिसराची पाहणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोना संसर्ग विषाणूमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियम व अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. भवानीनगर परिसरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे त्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या भागाची पाहणी करुन नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच हा भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून हा भाग सील करण्यात येणार आहे. तसेच या परिसरामध्ये फवारणी करण्यात येणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी केले.

भवानीनगर (मार्केट यार्ड) परिसरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे आ. संग्राम जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या भागाची पाहणी केली.

यावेळी बाबासाहेब गाडळकर, मळू गाडळकर, संतोष सूर्यवंशी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने आता जास्तीत जास्त खबीरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू हा संसर्ग असल्याने तो नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रुग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रत्येक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

यासाठी प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा नियम प्रत्येकाने काळजीने पाळणे अत्यावश्यक आहे. फोटो ओळी नगर : भवानीनगर (मार्केट यार्ड) परिसरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे आ. संग्राम जगताप,

आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी बाबासाहेब गाडळकर, मळू गाडळकर, संतोष सूर्यवंशी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment