कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत.

नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले.

त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र भितीचे वातावरण असल्याने अनेकांच्या मनात शंका-कुशंका आल्याने कोणीही नातेवाईक, मित्र परिवार याप्रसंगी आला नाही.

मयत किशोर पवार यांची पत्नी व मुलगा यांच्यावर तर दु:खाचा डोंगरच कोसळलाच होता. वेळ झाल्याने त्यांची अंत्यविधीची तयारी करणे गरजेचे होते.

अशावेळी कोणीही नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित नसल्याने परिसरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य जुबेर शेख यांनी पुढकार घेत मुबीन जहागिरदार व जिया शेख यांच्या मदतीने अंत्यविधीची तयारी केली.

त्यासाठी मोक्षवाहिनी बोलावून घेऊन, अमरधाम येथे कळवून तेथील विद्युत दाहिनीची व्यवस्था केली. त्याबरोबर अंत्यविधीसाठी लागणार्‍या इतर गोष्टींसाठी मदत केली. स्वत:खांदेकरी होत विधीवत अंत्यसंस्कार पार पाडले.

पवार कुटूंबियांवरील अशा दु:खद प्रसंगी मानवतेच्या दृष्टीकोनातून मुस्लीम समाजातील युवकांनी जी मदत केली ती समाजासाठी एक आदर्श आहे. आज कोरोनामुळे प्रत्येक मनुष्य एकमेकांकडे संशयाने पहात आहे.

कोणीही-कोणाला जवळ करण्यास तयार नाही हे एकीकडे दिसून येत असतांना दुसरीकडे मदत करण्यासाठी जात-धर्माचा अडसर येत नाही, हेच यावरुन दिसून येते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्यावतीने अडचणीतील नागरिकांना मदत करण्यात येत असते.

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर तर राज्यतील विविध जिल्ह्यात फ्रंटचे सदस्य कोणत्याही धर्माच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाच्या सहकार्याने विशेष मदत करत असल्याची माहिती जुबेर शेख यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment