नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा – पंचपीर चावडी – जुना बाजार रोड – मदवाशाह पीर – बारातोटी कारंजा – इवळे गल्‍ली चौक – वरवंडे गल्‍ली – सौभाग्‍य सदन – विळदकर गल्‍ली – पारगल्‍ली – विशाल गणपती मंदिर उत्‍तर बाजु – आशा प्रोव्‍हीजन स्‍टोअर्स – फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट झोन

तर संत कैकाडी महाराज व्‍यापारी संकुल – बगदादी खानावळ – खाटीक गल्‍ली – सवेरा हॉटेल – नागरे गल्‍ली – माणकेश्‍वर गल्‍ली – भिस्‍त गल्‍ली – शेरकर गल्‍ली – गोंधळे गल्‍ली – इवळे गल्‍ली – कौठीची तालीम – दवकर गल्‍ली – अमन पाटील रोड – माळीवाडा वेस – भोपळे गल्‍ली – संत कैकाडी महाराज संकुल हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

आजपासून या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून त्या १७ जून २०२० रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमधील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. आणि बफर झोन क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इत्यादी बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहेत.

त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर शहरातील माळीवाडा परिसरात कोरोना विषाणू लागण झालेल्या व्यक्ती आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी हा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आला आहे. सार्वजनिक ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे हा आदेश उद्घोषित करण्‍यात यावा. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7 कार्यरत ठेवावी.

सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत. अहमदनगर शहरातील या भागासाठी आयुक्‍त, महानगरपालीका, अहमदनगर सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील.या क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. संत कैकाडी महाराज व्‍यापारी संकुलाकडून फुलसौंदर चौकाकडे येणारा रस्‍ता हा येण्याजाण्याचा मार्ग निर्धारित करण्यात आला आहे.

या ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्‍तुंची वाहतुक व वितरण व्‍यवस्‍थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्‍यात यावा. ये-जा करणा-या व्‍यक्‍तींची थर्मल स्‍कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्‍यात यावी.कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जीवनावश्‍यक वस्‍तु सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे.या क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात.

त्‍याकामी जीवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बॅंक प्रतिनिधी मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात.पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन येण्याजाण्याचा मार्ग सरकत्या बॅरेकेडस द्वारे खुले ठेवावेत. या प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे.

या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल. कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment