एकीकडे आई कोरोनामुक्त झाली तर दुसरीकडे मुलगा बाधित ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : राहाता तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून  निमगाव येथील भाजीविक्रेती महिला गुरुवारी करोनामुक्त होताच दुसरीकडे तिच्या  मुलाचा अहवाल करोना पाँझिटीव्ह आल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली 

सदरील तरुणांसोबत विलगीकरण कक्षात असलेल्या इतरांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले असून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या असून निमगाव येथे कंटेनमेंट तसेच बफर झोन घोषीत केला आहे.

शिर्डी नजीकच्या निमगावातील भाजीविक्रेती महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता, त्यानंतर तिच्या कुटुंबातील सहाजणांना करोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले.

प्रशासनाने तिच्या संपर्कातील घरच्या तसेच अन्य लोकांना निमगाव येथील साईबाबा संस्थानच्या साईआश्रम फेज 2 मध्ये विलगीकरण कक्षात ठेवले होते.

यावेळी तिच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्यास अचानकपणे त्रास जाणवू लागल्याने त्याचे स्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवले असता सदरचा अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी सांगितले.

काल गुरुवारी सदरील भाजीविक्रेती महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले असून होम क्वारंटाईन ठेवण्यात आले असतांना दुसरीकडे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या तिच्या दुसर्‍या मुलाचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा निमगावात खळबळ उडाली आहे.

एकिकडे आई करोनामुक्त झाली तर दुसरीकडे मुलगा करोनाबाधित यामुळे सध्या या भाजीविक्रेती महिलेच्या कुटुंबातील एकूण सहा जण करोनाबाधित आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment