कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये कोरोनाचे दोनशे रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

यामुळे नगर जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्नांची संख्या 204 झाली आहे.

नगर शहर -३ : स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित.

पाथर्डी – २:
चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजाडे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण.

राहाता – १:
राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

संगमनेर – १ :
संगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.

शेवगांव – १ : चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला 27 वर्षीय युवक बाधित.

कळवा ( ठाणे) – १: कळवा ठाणे येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित.

Leave a Comment