फरारी असणाऱ्या आरोपीचा वाढदिवस साजरा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : फरार आरोपीचे बर्थडे सेलिब्रेशन निघोज पोलिस दूरक्षेत्रात विविध गंभीर गुन्ह्यांत फरारी असणाऱ्या आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे केली.

काही दिवसांपूर्वी गुन्हेगारांशी सलगी ठेवण्याचा आरोप असणाऱ्या शिवाजी कावडे या पोलिस कर्मचाऱ्याची गुन्हेगारांशी सलगी ठेवण्याच्या कारणांमुळे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

या कर्मचाऱ्याची चौकशी चालू असताना गुरुवारी हा वाढदिवसाचा प्रकार घडल्याने निघोजसह तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वाढदिवसाच्या या कार्यक्रमाचे फोटो समाज माध्यमांमध्ये आल्यानंतर लोकजागृती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी या प्रकाराविषयी संबंधितांकडे चौकशी केली असता

या आरोपींकडून पोलिसांना इतर गुन्ह्यातील आरोपी शोधण्यास मदत होते. तपास कामात मदत होते, अशी सारवासारव करण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment