मुंबईहून आलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : लोणी खुर्दमध्ये मुंबईहून आलेले क्वारंटाइन केलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली.

लोणी खुर्दमध्ये एका शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आता मुंबईहून प्रवरानगर येथे भावाकडे आलेली ३४ वर्षांची बहीण व तिचा १० वर्षांचा मुलगा पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांना लोणी खुर्द येथील शाळेत दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर घरातील एका वेगळ्या खोलीत आठ दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले होते.

जिल्ह्यात आणखी पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, १२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून आतापर्यंत एकूण १२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment