आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात ‘ही’ व्यक्ती झाली सक्रीय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शेतीचे नवनवीन उपक्रम सुरू असतानाच आता त्यांचे वडील तथा बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे मुलाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

चार दिवसांत २४ ठिकाणी त्यांनी चर्चासत्रे घेतली. ट्रस्ट व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हिताच्या योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतात चांगल्या प्रतीचे दर्जेदार वाण पेरता यावे आणि याच माध्यमातून शेतकरी सक्षम बनेल हा दृष्टीकोन समोर ठेवून खरीप पेरणीपूर्व नियोजन करण्यात आले.

राजेंद्र पवार यांनी जलसंधारण, पीकविमा, दर्जेदार वाण आदींसह कोरडवाहू भागात जलदगतीने येणाऱ्या तूर, बाजरी, कांदा, उडीद आदी पिकांच्या वाणाविषयी माहिती दिली.

तूर, बाजरी, मका, उडीद या पिकांबरोबरच कांदा लागवड, फळबागांमध्ये आंबा, लिंबू घेण्याबाबतही मार्गदर्शनही करण्यात आले.

पांडुरंग फुंडकर कृषी योजनेंतर्गत फळबाग लागवड, एनएचएम शेततळे, फळबाग, ट्रॅक्टर, रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे व वैयक्तिक लाभाच्या योजनांची तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे याांनी माहिती दिली.

शेतकरी गटाला महत्त्व देण्यात येणार आहे. पुढील काळातही फळबागांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी राजेंद्र पवार यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment