पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर तो माजी सैनिक वाचला असता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :सोयरिकीच्या वादातून तालुक्यातील जातेगाव येथील निवृत्त सैनिकाला जीव गमवावा लागला. सात ते आठ व्यक्तींनी या जवानाला दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले.

या घटनेमुळे सुपे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. औटी व पोटघन कुटुंबातील वादात पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता.

पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यपध्दती विषयी संताप व्यक्त होत आहे. मृतदेह सुपे येथे आणण्यात आल्यानंतर संतप्त नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला.

उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी नातलगांशी चर्चा केली. आमदार नीलेश लंके यांनी मध्यस्ती केल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

आरोपीत दोघांच्या नावाचा समावेश करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी जातेगाव येथे नेण्यात आला.

काही आरोपींची नावे वगळली

मनोज औटी यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद घेतली गेली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

उशिरा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही काही आरोपींची नावे वगळली. इतर आरोपींची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यासाठी मृतदेह असेली रूग्णवाहिका सुपे पोलिस ठाण्यासमोर लावण्यात आली.

आमदार लंके यांनी पोलिस ठाण्यात जाऊन चर्चा केल्यानंतर दोन आरोपींची नावे गुन्ह्यात वाढवण्यात येऊन खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment