Fb अकाउंट हॅक करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : फेसबूक अकाउंट हॅक करून मोबाइलधारकाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. संबंधित मोबाइलधारकाने पोलिसांच्या सायबर शाखेकडे याबाबत तक्रार केली आहे.

बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे फेसबूक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून सर्व व्यक्तींचे मोबाइल नंबर मिळवत मला पैशांची गरज असून तातडीने फोन पेवरील खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली.

मात्र, हिंदीत संदेश पाठवल्यामुळे गाडे यांच्या मेव्हण्याला संशय आला. त्यांनी अमोलला फोन करून विचारणा करताच मी पैसे मागितलेच नाहीत, असे अमोलने सांगताच मेव्हण्याने स्क्रीन शाॅट काढून पाठवला.

त्याचदरम्यान अमोलला एका व्यापाऱ्याचाही फोन आला. मग अनेक मित्रांचे फोन सुरू झाले. त्याने गुन्हे शाखेचे रवींद्र कर्डिले व मनोज गोसावी यांना हा प्रकार सांगितला.

त्यांनी व्हाॅटसअॅपवर संदेश पाठवण्यास सांगितला. अशाच प्रकारे गावातील चार-पाच जणांचे अकाउंट हॅक करण्याच्या घटना घडल्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment