विलगीकरण कक्ष परिसरात निघताहेत विषारी साप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : राहुरीच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य काॅलेजच्या लेडीज होस्टेल परिसरात घोणस, धामीण सारखे सर्प वारंवार आढळून येत

असल्याने क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर परिषद, पोलिस व काॅलेजच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी महसूल व आरोग्य विभागाकडून राहुरी काॅलेजच्या लेडीज होस्टेलवर गेल्या महिन्याभरापासून विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली.

शुक्रवारी रात्रीपर्यंत क्वारंटाइन केलेल्या पुणे, मुंबई, नाशिक, नगर व राहुरी येथील २२ नागरिकांना होस्टेलच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची राखणदारी करण्यासाठी नगर परिषद, पोलिस व काॅलेजच्या एकूण पाच कर्मचाऱ्यांची सकाळ, संध्याकाळ या दोन वेळात नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, होस्टेलच्या परिसरात रात्रीच्या वेळी घोणस, धामणसारखे सर्प आढळून येत असल्याने राखणदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना राहण्याची व आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करून देताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत महसूल व आरोग्य प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment