चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे नऊ महिन्याच्या गरोदर महिलेसोबत झाले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी मोठा गलथान कारभार समोर आला असून याचा मनःस्ताप एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सहन करावा लागला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यानंतर या महिलेला पॉझिटिव्ह आला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे घरातल्या सर्वानाच क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांना नायर हॉस्पिटलला पाठवण्यात आले.

केवळ नायर हॉस्पिटलच नव्हे तर अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये एकट्या महिलेला चार हॉस्पिटल फिरावे लागले.

मात्र नायर हॉस्पिटलमध्ये सदरचा रिपोर्ट या महिलेचा नसून केवळ आडनाव समान असल्याने चुकून हा रिपोर्ट या महिलेला देण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

यापूर्वी चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या एका खाजगी लॅबवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. मात्र आता पालिकेच्याच लॅबने चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी जाधव यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment